नवी दिल्ली :
भारतीय फुटबॉल संघाने शनिवारी फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी क्वालिफाय होत इतिहास रचला आहे. फिफा नेशन्सच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये कोरिया आणि मलेशियाचा पराभव करून भारत स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला आहे. ही स्पर्धा 27 ते 30 जुलै दरम्यान कोपनहेगन, डेन्मार्क येथे होणार आहे.
भारतीय फुटबॉल संघाची सुरुवात 2021 साली झाली. तेव्हा एआयएफएफने फिफा नेशन्स सीरीज 2021 साठी फिफासोबत भागीदारी केली. या स्पर्धेत भारत 60 देशांमध्ये होता. मध्य पूर्व आणि आफ्रिका क्षेत्रात भारताला ठेवण्यात आलेलं. एका स्थानाच्या फरकाने भार फिफा नेशन्स प्लेऑफ 2021 मध्ये स्थान मिळवण्यापासून हुकलेला.
भारत 22 व्या जागतिक क्रमवारीसह इटली, अर्जेंटिना आणि स्पेन सारख्या दिग्गजांच्या वरच्या स्थानावर आहे. 2022 हंगामासाठी, भारताला आशिया/ओशनिया प्रदेशात सोडण्यात आले आणि प्ले-इनमध्ये ठेवण्यात आले. जे प्लेऑफसाठी थेट क्वालिफाय करेल. प्लेइनमध्ये भारताने 32 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 12 विजय, 11 पराभव आणि 9 सामन्यांचा निर्णय लागला नाही. संपूर्ण चार सामन्यांच्या आठवड्यात, भारताने डिव्हिजन 1 मध्ये त्यांचे स्थान कायम ठेवले.
भारत प्लेऑफमध्ये यशस्वीरित्या पात्र ठरला. या कालावधीत भारताने 19 ची सर्वोच्च जागतिक क्रमवारी देखील गाठली. प्लेऑफमध्ये जाताना भारतासाठी लक्ष्य सोपे होते. 2 सामने जिंकून शोपीस इव्हेंटमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले. चरणजोत सिंग, सिद्ध चंद्राना आणि सर्शन जैन यांच्या मदतीने भारताने कोरिया आणि मलेशियाचा पराभव केला आणि आता हा संघ जुलैच्या अखेरीस डेन्मार्कला जाणार आहे.