नवी दिल्ली :
फिनलॅन्डमध्ये सुरू असलेल्या कुओर्तन गेम्समध्ये भारताचा स्टार ॲथलिट नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
शनिवारी त्याने ८६.६९ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत कोणत्याही खेळाडूला नीरज चोप्रा इतका लांब थ्रो फेकता आला नाही. या शानदार कामगिरीसह नीरजने सुवर्णपदक पटकावले.
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने 89.30 मीटर भाला फेकून नवा राष्ट्रीय विश्वविक्रम केला आणि ऑलिम्पिक खेळांनंतर प्रथमच फिनलॅन्ड येथे झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले.
२४ वर्षीय नीरज चोप्राने ८६.६९ मीटर थ्रोने सुरुवात केली. त्याचा फेक सुवर्णपदक जिंकणारा ठरला. त्रिनिदाद आणि टोबॅगोचा 2012 ऑलिंपिक विजेता केशॉर्न वॉल्कोर्ट दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 86.64 मीटर अंतरापर्यंत थ्रो फेकला. पीटर्सने 84.75 मीटर अंतरासह तिसरे स्थान पटकावले.