पुण्यातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे. अमोल बालवडकर फाऊंडेशन व क्रीडा व युवा संचालनालय तर्फे आयोजन !

0
slider_4552

बालेवाडी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या पुढाकाराने २१ जून रोजी जगभरात योग दिन साजरा होतो आहे. याच धरतीवर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे पुण्यातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळं संयुक्त राष्ट्रांनी २१ डिसेंबर २०१४ रोजी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या वर्षापासून अगदी जगभरात योग दिन साजरा केला जातो.

या कार्यक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, येत्या २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त देशभरातील सर्वाधिक तरुण योगासने करणार आहे. त्यात आपल्या पुण्याचा वाटा मोठा असणार आहे. म्हणुनच पुण्यातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित केला असून सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट आणि योगा मॅट मोफत अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतला असुन कोणती कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. स्टेज, टि शर्ट वितरण व्यवस्था, अल्पपोहाराची व्यवस्था, प्रत्येक सदस्याला देण्यात येणारे योगा मॅट या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. बाणेर, बालेवाडी, सूस, महाळूंगे, औंध परिसरातील नागरिकांना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आव्हान केले आहे की, जास्तीत जास्त नागरिकांनी योग दिनाच्या कार्यक्रमांत सहभागी होवुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

योगा सोबतच आर्टिस्टीक योगा, रिदमीक योगा, झुंबा, मल्लखांब खेळ ई. कार्यक्रमही सादर होणार आहेत. म्हणजे हा योगदिन नागरिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

या कार्यक्रमामध्ये वसुंधरा अभियान बाणेर, बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन, बालेवाडी रनर्स, नवचैतन्य हास्य योग परिवार, पेडल बुस्टर्स, भारती विद्यापीठ यांचा विशेष सहभाग असणार आहे.

२१ जून २०२२ सकाळी ६.३० वाजता

See also  लहू बालवडकर सोशल वेल्फेअर च्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

स्थळ: मुख्य स्टेडियम, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी

अधिक माहिती साठी संपर्क :
नगरसेवक अमोल बालवडकर संपर्क कार्यालय
बाणेर ऑफिस : 9256070707
बालेवाडी ऑफिस : 9028790999

सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
https://bit.ly/Yogadin2022