श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचा ३५वा वर्धापन दिन साजरा

0
slider_4552

बालेवाडी:

एसकेपी कॅम्पस बालेवाडी येथे श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचा ३५वा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर व सचिव डॉ. सागर बालवडकर, सौ. रुपालीताई बालवडकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पल्लवी दाभाडे सरपंच तळेगाव माळवाडी व मनीष रानवडे यांची पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विवेक बाळकृष्ण शिर्के याला इंस्पायर अवार्ड मिळाल्याबद्दल त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सीएम इंटरनॅशनल च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सागर बालवडकर यांनी केले. श्री खंडेराय प्रतिष्ठान च्या जडणघडणीमध्ये संस्थेचा शिक्षक वर्ग व कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा असुन भविष्यात देखिल संस्थेला सर्वजण असेच सहकार्य करत राहतील.

प्रमुख पाहुणे श्री संदीप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही देशाचे भविष्य असून आदर्श व्यक्तिमत्त्वांचा अनुकरण करावे असे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे यांच्या हस्ते संस्थेच्या विविध शाखांच्या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहित केले.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्ञानसागर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि ज्ञानसागर आर्ट्स कॉमर्स कॉलेजच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी सरपंच अंकुशराव बालवडकर, पै. विकास रानवडे, ॲड. माशाळकर हेही उपस्थित होते.

See also  शिक्षकांनी कोविड योध्दा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली : मिनाक्षी राऊत