औंध :
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी आम्ही सेवा पंधरवडा म्हणून साजरा करणार आहोत. 17 सप्टेंबर हा पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस असतो. आपला वाढदिवस साजरा करु नये त्या ऐवजी सेवा सप्ताह साजरा करावा अशी त्यांची इच्छा असते. म्हणुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते सचिन मानवतकर यांच्या वतीने भाजपा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मतदारसंघ प्रभाग क्रमांक १२ औंध-बालेवाडीच्या वतीने औंध गाव येथील स्मशान भुमी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
याबद्दल माहिती देताना भाजपा युवा नेते सचिन मानवतकर यांनी सांगीतले की, आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष व लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. औंध स्मशान भूमी ची निवड करून तेथे स्वच्छ्ता मोहिम राबवली आहे. व प्रभाग क्रमांक १२ च्या वतीने युवकांना सोबत घेवून ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमांत सहभागी झालो. पुढे देखील विविध सेवा भावी कार्यक्रम करणार आहे.
औंध स्मशान भूमी येते स्वच्छ्ता मोहिम राबविलेली पाहून परिसरातील नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभाग घेतला व सचिन मानवतकर यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी युवकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला