नितीन रणवरे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या च्या निमित्त विविध उपक्रम

0
slider_4552

औंध :

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सेवा पंधरवड्या च्या निमित्ताने भाजपा युवा नेते नितीन रणवरे यांच्या वतीने इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत, औंध, पॅन कार्ड रोड बाणेर, आणि तुकाई टेकडी या ठिकाणी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण हे उपक्रम राबविले.

याची माहिती देताना युवानेते नितीन रणवरे म्हणाले की, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून देशभर समाज हिताची समाजसेवेची काम करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही देखील सामाजिक बांधिलकी जपत परिसरात विविध उपक्रमाद्वारे सहभागी झालो आहे.

यावेळी नितीन रणवरे मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छ्ता मोहिम आणि वृक्षरोपण करण्यात आले.

See also  सुतारवाडी महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी.