कमी खर्चात माॅडर्न विद्यार्थ्यांनी दिला पौष्टिक आहाराचा मार्ग

0
slider_4552

मॉडर्न :

गणेशखिंड माॅडर्नमधे विश्वआयोगाने जाहीर केल्याप्रमाणे मिलेट वर्षाचा कार्यक्रम साजरा केला. बॅचलर आँफ फुड टेक्नॉलॉजी विभाग माॅडर्न महाविद्यालय व असोसिएशन आँफ फुड सायन्टिस्ट अँड टेक्नॉलॉजी ईन ईंडिया यांच्या सहयोगाने नविन पदार्थ बनविणे – (मिलेट म्हणजे स्थानिक धान्याचा वापर करुन ) व मिलेट वापरून केलेल्या वेगवेगळ्या पदार्थाचे पोस्टर प्रेझेंटेशन या दोन स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.

यात विद्यार्थ्यांनी बनवलेले काही खाद्यपदार्थ सादर केले
१) मल्टीग्रेन कुकी
२)मिलेट प्रोटीन शेक आणि लाडू
३) सरघम नाचोस
४) इम्यून बूस्ट पावडर
५) ग्लूटेन फ्री पिझ्झा
६) ज्वारी चावणे
७) ज्वारी मुथ्या
व पोस्टर सादर केले.

या स्पर्धेत डाॅ अमित कुलथे, एम आय टी व डाॅ एस एम नाईकरे यांनी परीक्षक म्हणून काम केले.
या प्रसंगी परीक्षक म्हणाले,”वजन कमी करणे, वाढविणे, अशक्तपणा, ह्रदयरोग,डायबेटिस व अन्य रोग बरे करण्यास हे पदार्थ अत्यंत उपयोगी आहेत.”

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
विजेत्यांची नावे
पोस्टर सादरीकरणासाठी:
१) प्रफुल्ल गोलांडे, संस्कृती कांत.
विषय : जादुई धान्य बाजरी

२) सानिका काकडे, प्राची काकडे.
विषय : जादुई बाजरी रेसिपी.

3) अनिकेत रगडे, तेजस जगताप.
विषय: बाजरी “विसरलेले अन्न”

अन्नासाठी
१) रुचिता घेगडे, मयूर गायकवाड.
विषय: चोको ट्रफल आणि इम्यून बूस्ट पावडर

२) रोहित भोईटे, शंभूराज जगताप.
विषय : नाचणी लाडू, बाजरी आधारित प्रोटीन शेक.

३) शिवानी पाटील, विश्वजीत मोरे.
विषय : ज्वारी मुठिया.

या स्पर्धेत ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
“वरील सर्व पदार्थ हे तब्येतीसाठी अत्यंत चांगले असुन हे प्राॅडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी महाविद्यालय प्रोत्साहन देईल असे प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले.
प्रा भाग्यश्री सरोदे, प्रा मृणाल परदेशी व डाॅ रूपाली शिंदे यांनी संपूर्ण उपक्रमाला मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपप्राचार्य, विद्यार्थी उपस्थित होते.
सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

See also  पुणे जिल्ह्यात आणि पुणे महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात