समृद्धी महामार्गाची पाहणी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवली गाडी मुख्यमंत्री शिंदे शेजारी..

0
slider_4552

शिर्डी :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत.

तत्पूर्वी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्टेअरिंगची कमान स्वतःच्या हाती घेतली होती.

नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले. असं असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर खात्यावरून वाहन चालवितांना त्यांना आलेला अनुभव आणि त्या संदर्भात ट्विट केले आहे.

‘यूहीं चला चल राही’ या प्रसिद्ध गाण्याच्या शीर्षकाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलं आहे. ते लिहितात की, नागपुरहून सुरू होणाऱ्या हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून गाडी अशी धावते की वाटतं ही सफर कधी संपूच नये. सुसाट आणि सुरक्षित!

 

See also  सातारा जिल्हा सहकारी बँकेला ईडीची नोटीस !