पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणेच्या वतीने दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी बाणेर येथील संग्राम मुरकुटे पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय होताना मागील काही काळापासून राबविलेले विविध समाज उपयोगी उपक्रमामुळे ते नेहमी चर्चेत आले होते. युवकांमध्ये एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.







राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते या संबंधित निवडीचे पत्र युवा नेते संग्राम मुरकुटे पाटील यांना देण्यात आले. यावेळी इतर पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल युवा नेते संग्राम मुरकुटे पाटील यांनी पक्षश्रेष्ठी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहर चे आभार मानले. पुढील काळात अतिशय जोमाने पक्ष वाढीसाठी काम करत राहून माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करून दाखवील असा आत्मविश्वास संग्राम मुरकुटे पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
एक युवा व्यावसायिक म्हणून प्रसिद्धी मिळविल्यानंतर आपल्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून त्यांना मिळालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष पदा मुळे त्यांची राजकिय ताकत वाढून सक्रिय राजकारण करण्यास त्यांना प्रेरणा मिळणार आहे.








