महाळूंगे :
हिंजवडी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ व त्यांचा स्टाफ असे दिनांक ०२/०२/२०२३ रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन हदित पेट्रोलींग करीत असताना शिवज्ञा रेस्टॉरंट हॉटेल जवळ म्हाळुंगे नांदे रोड, म्हाळुंगे ता मुळशी जि, पुणे येथे रस्त्यावर एक इसम जवळ पिस्टल हत्यार बाळगुन असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ यांनी त्यांचे स्टाफसह तात्काळ सदर ठिकणी जाऊन त्या इसमास ताब्यात घेतले.
सदर ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल हत्यार व जिवंत राउंड मिळुन आलेने त्यास लागलीच सदर हत्यारासह ताब्यात घेऊन त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महा.पो. अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कारवाई केली आहे.
सदर इसमास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ यांनी त्यांचे स्टाफसह शिवज्ञा रेस्टॉरंट हॉटेल जवळ म्हाळुंगे नांदे रोड, म्हाळुंगे येथे तात्काळ जाऊन सदरची कारवाई केलेने त्या इसमाचे हातुन दखलपात्र गुन्हा होणे पासुन प्रतिबंध केला आहे. पिस्टल हत्यार जवळ बाळगून असलले इसमाचे नाव खालीलप्रमाणे.
१) राज कुमार मानवतकर, वय – १९ वर्षे, रा पाषाणगाव पुणे.
मा.पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांचे दिनांक २३/०१/२०२३ रोजी चे प्रतिबंधात्मक आदेशाच्या
अन्वये कोणीही इसम विना परवाना सार्वजनिक ठिकाणी कोणतेही शस्त्र, सोटे भाले, चाकु, सुरा, कोयता, तलवारी, दंड काठया, बंदुका व शरीरीक इजा करता येईल अशी कोणीतीही वस्तु जवळ न बाळगणे असे प्रतिबंधक आदेश असल्याने त्याच अनुशंगाने त्याच अनुशंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशान्वये सायंकाळी पोलीस स्टेशन हदित पेट्रोलींग करीत असताना सदरची कारवाई केली आहे.
सदरची कारवाई मा.विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. मनोजकुमार लोहीया सह पोलीस आयुक्त सो, मा. डॉ संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त साो. मा. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि. २, मा. श्रीकांत डिसले सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापू देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा. पो. फौजदार महेश वायबसे, पोहेकॉ/१०४१ संतोष डामसे, अमंलदार / २६५९ रवी पवार यांनी केली आहे.