शिरूर :
गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मु. पो.निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथे पार पाडले. शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ सविताताई करपे, श्री विजयदादा रणसिंग, पंचायत समिती सदस्य, माजी प्राचार्य डाॅ गोविंद निंबाळकर, डॉ संजय खरात, प्राचार्य मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड यांच्या हस्ते झाले.
या गावाला श्री म्हसोबा देवाचा आशीर्वाद आहे. या गावात ऊस, कांदा, ज्वारी, बाजरी हा मुख्य व्यवसाय आहे. म्हणून महाविद्यालयातर्फे रसायन शस्त्र विभागाने पाणी परीक्षण व माती परीक्षण केले. फ्युचर बँकिग फोरम तर्फे बँकिग साक्षरतेचा कार्यक्रम केला.
शिबीराचा एक भाग म्हणून गावाचा सर्वे करण्यात आला.गावात आर्थिक साक्षरता कमी असल्याने बँक व्यवहाराची जागृतता निर्माण व्हावी व आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी महाविद्यालतील कॉमर्स विभागातर्फे एम काँम च्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले.
महाविद्यालयातील अनेक मान्यवरांनी शिबीराला भेट देऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यांनी रस्ते, वाडे, मंदिरे, शाळा यांची साफ सफाई केली. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटले. सामाजिक विषयावरील पथ नाट्य सादर केली.
या शिबिराला डॉ शुभांगी जोशी, उपप्राचार्य, कॉमर्स व डाॅ ज्योती गगनग्रास यांनी मार्गदर्शन केले.
प्रो. कुमोद सकपाळ, कार्यक्रम अधिकारी, डाॅ. मंजुषा कुलकर्णी, सह कार्यक्रम अधिकारी प्रो. गोविंद कांबळे यांनी विद्यार्थी व गावकरी यांच्याशी संवाद साधून शिबीर यशस्वी केले. शिबिराला प्राचार्य डॉ संजय खरात यांचे मार्गदर्शन होते. समारोप प्रसंगी डाॅ. गोविंद निंबाळकर , राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी निकम, भानुदास सात्रस, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक मारुती निकम सर, सरपंच सविताताई करपे, अजित चौधरी, उपसरपंच, उद्योजक विजयदादा करपे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले सर्व निमगाव म्हाळुंगी येथील ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ हे उपस्थित होते. या शिबिराला विशेष सहाय्य बापू काळे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य यांचे लाभले. कार्यक्रमाला डाॅ प्रकाश दिक्षित उपकार्यवाह, पी ई सोसायटी हे उपस्थित होते. शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संजय खरात यांचे मार्गदर्शन होते. प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी यांनी अभिनंदन केले.