पुणे:
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ फेब्रुवारी ला PIECC ग्राउंड मोशी, पुणे येथे महासत्संग मेळावा, ११ लाख भाविकांच्या उपस्थितीत संप्पन होत आहे. या महासत्संग मेळाव्यात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत.
या मध्ये विवाह संस्कार विभागांतर्गत सर्व धर्मीय वधुवर परिचय मेळावा तसेच जवळपास ५००० विवाह निश्चितीचे उद्दिष्ट आहे. स्वयंरोजगार विभागा अंतर्गत महारोजगार मेळाव्यात परिसरातील ३५० पेक्षा अधिक देशी व विदेशी कंपन्यांमध्ये ११००० जागा महाभरतीचे उद्दिष्ट आहे. उद्योजक विकास धोरण अंतर्गत ११००० पेक्षा जास्त युवक युवतींना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच विविध उद्योगांचे ५०० हुन अधिक स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत.
राष्ट्रकल्याणाकरीता सव्वा कोटी श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन तसेच श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण, जगत् गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग व पसायदान पठण होणार आहे. विविध आजारांच्या २०० तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. परमपुज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ फेब्रुवारी ला PIECC ग्राउंड मोशी, पुणे येथे महासत्संग मेळावा संप्पन होत आहे.
या महासत्संगात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नामांकित कंपन्या मध्ये चांगल्या पगाराच्या सुमारे अकरा हजार जागांसाठी नोकर भरतीचे आयोजन विनामूल्य पद्धतीने केलेले आहे. त्या सोबतच विवाह संस्कार विभाग अंतर्गत सर्व जाती धर्मीय वधू-वर विवाह नाव नोंदणी व मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विनामूल्य विवाह इच्छुकांची नावनोंदणी करुन साठ हजारहून अधिक स्थळांची माहिती उपलब्ध करुन पाच हजार विवाह जमवण्यात येणार आहेत. सोबतच भव्य आरोग्य शिबिर दोनशे पेक्षा अधिक नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आयोजित केले आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती पुणे याचे मार्गदर्शक सतिष मोटे यांनी सांगितले की, या महासत्संग सोहळ्यास अकरा लाख भाविक, स्वामीभक्त, सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. १५० एकर परिसरात बसेस, कार, मोटर सायकल पार्किंग व्यवस्था, ५० एकर परिसरात भव्य स्टेज व बैठक व्यवस्था, ११ लाख भाविक सेवेकऱ्यांना मोफत अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप असे नियोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून महासत्संग मेळाव्यात विश्वविक्रमी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, सव्वा कोटी श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण, श्री तुकारामांचे अभंग पठण व पसायदान पठण असे बहुविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
या महासत्संग सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, सर्व धर्म व पंथाचे धर्मगुरू, शासकीय अधिकारी, समाजसेवक, पत्रकार, नामवंत डॉक्टर व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या अद्वितीय सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती पुणे तर्फे करण्यात आले आहे.