खडकी – बोपोडी येथील पोलीस चौक्या सुरु कराव्यात…!!

0
slider_4552

मुंबई :

मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सन २०२३ – २०२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने गृह विभाग व स्वच्छता विभागावर मागणी केली.

गृह विभाग

शिवाजीनगर मतदारसंघातील “बोपोडी – खडकी या भागांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुले नशापान, चोऱ्या, छेडछाड, मारामारी, इ. गुन्हे वारंवार करीत आहेत. तसेच छोट्या व्यापाऱ्यांना धमकावणे व हफ्ते मागणे असे प्रकार वाढत चाललेले आहेत.

बोपोडी परिसरातील जुन्या जकात नाक्यावर पोलीस चौकी असून ती बंद आहे. तसेच खडकी बाजार पोलीस चौकी सुद्धा बंद आहे. यामुळे खडकी – बोपोडी येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी बोपोडी – खडकी भागात पोलीस चौक्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून सदरील दोन्ही पोलीस चौक्या सुरु कराव्यात, अशी मागणी यावेळी मा. गृहमंत्री महोदयांना केली.

स्वच्छता विभाग

शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अनेक सेवा वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये मी सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान सुरू केले. आत्तापर्यंत जवळपास १०० सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मला शौचालयांची दुरावस्था निदर्शनास आली.

See also  माॅडर्न महाविद्यालयाच्या वतीने मुला मुलींना छञ्यांचे वाटप.