सुसगांव, महाळुंगे आणि बावधन या गावांसाठी विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून आमदार संग्राम थोपटे यांनी महापालिका आयुक्तांना दिले निवेदन.

0
slider_4552

पुणे :

भोर विधानसभा मतदार संघातील मुळशी तालुक्यातील सुसगांव, महाळुंगे आणि बावधन या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला असल्याने या गावांच्या विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून विकास कामांना गती मिळावी या संदर्भात पुणे महानगर पालिकेचे आयुक्त मा.विक्रम कुमार यांची भेट घेऊन भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी निवेदन दिले.

याची माहिती देताना पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते यांनी सांगितले की, मागील पाच सहा महिन्यांपासुन भोर विधानसभेमध्ये येणाऱ्या सुसगांव, महाळुंगे आणि बावधन या गावांना भेडसावणाऱ्या समस्या आमदार संग्राम थोपटे यांना सांगितल्या होत्या. त्यांनी तात्काळ दखल घेत आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढण्यास सांगितले होते. परंतु सुरू असणारे कामे फारच संथ गतीने सुरू असून त्यांना वेग येणे गरजेचे आहे हे आमदारांना सांगितल्या नंतर तात्काळ आमदार संग्राम थोपटे यांनी आम्हा कार्यकर्त्यांसोबत आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सदर विषयी चर्चा केली. यावेळी सदर कामे जी सुरू आहेत ती तात्काळ पुर्ण करुण इतर कामे नियोजन करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले. लवकरच निविदा काढून कामे पुर्ण करू असे आश्वासन दिले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये सुसगाव महाळुंगे आणि बावधन या गावांसाठी ओपन जिम, सिमेंट काँक्रीट रस्ते, टॅंकरने गावठाण आणि सोसायटी वर्गास पाणीपुरवठा, शाळेसाठी बेंचेस, व्यायाम शाळेसाठी साहित्य, ठिकठिकाणी बस स्टॉप बसविणे, विद्युत विषयी कामे पूर्ण करून घेणे अशा विविध कामांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी नगरसेवक अजित दरेकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती धनंजय वाडकर, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते यांचासह प्रफुल दगडे, दिनेश ससार आदी उपस्थित होते.

See also  कु. सावरी शिंदे चे पालकत्व बाणेर करांनी स्वीकारले..