आता करा मुंबई पुणे थेट विमान प्रवास..

0
slider_4552

मुंबई :

मुंबई पुणे थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी आता अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. एअर इंडिया कडून ही विमानसेवा 26 मार्च पासून सुरू होत आहे. एका आठवड्यात सहा वेळेस ही विमान झेपावणार आहेत.

एअर इंडियापूर्वी जेट एअरवेज कडून मुंबई-पुणे थेट विमानसेवा सुरू केली होती पण 2019 मध्ये ही सेवा बंद झाली. मुंबई-पुणे रस्ते मार्गे किंवा काही ट्रेन्स मुळे 3-4 तासांचा प्रवास होतो पण आता मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी विमानसेवेमुळे तासाभरावर येऊन ठेपला आहे.

मुंबई कडून पुण्याकडे विमान सकाळी 9.45 ला झेपावेल आणि पुण्यात 10.45 ला लॅन्ड होणार आहे. तर परतीचं विमान म्हणजे पुणे-मुंबई विमान सकाळी 11.20 आहे. मुंबई मध्ये हे विमान 12.20 ला लॅन्ड होणार आहे. दरम्यान या विमानसेवेसाठी इकॉनॉमी क्लास करिता प्रवाशांना 2,237 रुपये आणि बिझनेस क्लाससाठी 18,467 रुपये मोजावे लागणार आहेत. शनिवार वगळता आठवडाभर ही विमानसेवा सुरू राहणार आहे.

मुंबई पुणे विमान प्रवासासाठी एअर इंडिया त्यांच्या ताफ्यातील सर्वात लहान विमान एअरबस ए 319 तैनात करणार आहे. देशांतर्गत विमानसेवेसोबतच पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवांना देखील चालना दिली जाणार आहे. पुण्यातून थेट जर्मनी, अमेरिका, इंग्लंड साठीही विमानसेवा सुरू होत आहे.

See also  लॉकडाऊन करायचा का ? जनतेने ठरवावे : मुख्यमंत्री.