मुळशी तालुक्यातील अतुल मारणे यांची बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कृषी नियामक मंडळावर नियुक्ती..

0
slider_4552

पुणे :

मुळशी तालुक्यातील अतुल मारणे यांची बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कृषी नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात संस्थेचे महासंचालक संदीप खोसला यांनी अतुल मारणे यांना नियुक्ती पत्र दिले.

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज हे भारतातील सर्वात जुन्या चेंबर्स पैकी एक आहे.चेंबरची स्थापना 1836 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. राज्यात उद्योजकता वाढी काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज सर्वांना सुपरिचित आहे.बॉम्बे चेंबरला 184 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्र व मुंबई शहराच्या विकासात चेंबरचा मोलाचा वाटा आहे.गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र व मुंबईतील उद्योगांच्या विकासासाठी चेंबरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. चेंबर हे नियामक संस्था, कॉर्पोरेट आणि व सरकार यांच्यातील संवादाचे प्रभावी साधन म्हणून काम करते. हे इतर उद्योग संघटनांशी सहयोग करते. राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल ( IAS)हे कृषी समितीचे अध्यक्ष आहेत.

अतुल मारणे ह्यांनी महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्था व कृषी महाविद्यालय,पुणे माजी विद्यार्थी संगटना तसेच अनेक संस्थांच्या नियामक मंडळावर व समित्यांवर मागचे काही वर्षे काम केले आहे. अतुल मारणे यांचा कृषि क्षेत्रातला अनुभव व जनसंपर्क संस्थेस कामी येईल. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची कृषी आणि अन्न प्रक्रिया समिती शेती विषयक प्रश्न सोडवण्यासाठी शासन व कृषी उद्योग यामधील दुवा म्हणून काम करते. बॉम्बे चेंबर शेतक-यांचे व कृषि क्षेत्राशी निगडीत असलेले विविध प्रश्न विविध स्तरावर मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे.बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज त्याच्या माध्यमातून कृषि, पणन, कृषि निर्यात, कृषि प्रक्रिया,पशुसंवर्धन, दुग्धोत्पदन, कृषि यांत्रिकीकरण, कृषी विषयक कायदे इ. विविध क्षेत्रातील व्यापक व्यासपीठा मार्फत राज्याच्या कृषी विकासासाठी भरीव योगदान देत असते.

See also  कामगारच जगाला पोसतो मात्र मुठभर लोकांची मक्तेदारी झाल्यामुळे अन्याय : न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील