बोपोडीत महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

0
slider_4552

औंध :

बोपोडी येथील बुद्ध भूषण मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा आदी महापुरुषांची जयंती सामुदायिक रित्या साजरी करण्यात आली. या संयुक्त जयंती महोत्सवाची सांगता महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक राघू फेम गायक राहुल शिंदे यांच्या बुद्ध – भीम गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात आली. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात या कार्यक्रम संपन्न झाला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मा.नगरसेवक प्रकाश ढोरे, भाजपचे पुणे शहर चिटणीस सुनील माने, मा.नगरसेवक आनंद छाजेड, ज्येष्ठ नेते अनिल भिसे, कॉंग्रेसचे विनोद रणपिसे, इंद्रजीत भालेराव,राजेंद्र भुतडा, विजय जाधव, ज्ञानेश्वर मुरकुटे, रमेश नाईक, जुबेर पिरजादे, सुंदरताई ओव्हाळ, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, खडकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल उसुरकर,राजू देवकर, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यानिमित्ताने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धभूषण मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेराव, अशोक गायकवाड, विनोद माने, सुभाष गजरमल, सिद्धार्थ बाराथे,चंद्रकांत बनसोडे, विनोद यादव, उत्तम गायकवाड, विनोद सोनवणे, रविंद्र शिंदे, संतोष भालेराव, रमेश कांबळे, महेंद्र कांबळे, विजयराव कांबळे, हिमाली गजरमल, अश्विनीताई गायकवाड , नंदाताई निकाळजे, विद्या भालेराव यांच्यासह मंडळाचे सर्व महिला व पुरुष कायर्कर्त्यांनी प्रयत्न केले.
राहुल शिंदे यांनी दोनच राजे कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, नांदण.. नांदण .. माझ्या रमाच नांदन, जयघोष चाले हा लाखो जनात यासारखी एकापेक्षा एक सरस गाणी गायली. राहुल शिंदे यांचे पुत्र रोहित शिंदे यांनी गायलेल्या जागला राबला समाजासाठी या गाण्याला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.

यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, आपल्याला संत महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्यांचे विचार युवा पिढीला निश्चित मार्गदर्शक ठरतील त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून युवा पिढीला हा महापुरुषांचा विचाराचा वारसा समजावून सांगितला पाहीजे असे मत व्यक्त केले.

See also  औंध रोड -खडकी जंक्शन स्टेशन येथील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष गजरमल सूत्रसंचालन अशोक गायकवाड सर आणि आभार शशिकांत भालेराव यांनी मानले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तर ‘ खीर ‘ वाटप करून बुद्ध जयंती साजरी केल्याचे सांगितले. मंडळामार्फत यापुढेही अशाप्रकारे सामजिक उपक्रम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.