बालेवाडी येथील ॲड. पांडूरंग थोरवे यांची जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक..

0
slider_4552

पुणे:

बालेवाडी येथील पुणे जिल्हा बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष ॲड पांडूरंग थोरवे यांची जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

धर्मादाय कार्यालयाने शुक्रवारी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांची नेमणूक केली. अभिजित अरविंद देवकाते (रा. बारामती), डॉ. राजेंद्र बबन खेडेकर (रा. कोथरूड), नवीन विश्वस्तांच्या पदासाठी मंगेश अशोक घोणे (रा. जेजुरी), विश्वास गोविंद पानसे (रा. बारामती), अनिल रावसाहेब सौंदाडे, ॲड. पांडुरंग ज्योतिबा थोरवे (रा. बालेवाडी) आणि पोपट सदाशिव खोमणे (रा. जेजुरी) अशी नवनियुक्त विश्वस्तांची नावे आहेत. ही नेमणूक पाच वर्षांसाठी असणार आहे.

जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका २०१७ ला झाल्या होत्या त्यांची मुदत डिसेंबर महिन्यात संपली होती. यानंतर नविन विश्वस्तांच्या पदासाठी अनेकांनी अर्ज केले होते. याआधी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी या सात जणांची नेमणूक पुणे सहधर्मादाय कार्यालयाचे सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी केल्या आहेत.

या विश्वस्तांमधून प्रमुख विश्वस्तांची निवड बैठक घेऊन निवड झालेले विश्वस्तच करणार आहेत. एका प्रमुख विश्वस्तांचा कालावधी हा ९ महिन्यांचा असून प्रत्येक विश्वस्तांना पाच वर्षात एकदा प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहण्याची संधी मिळणार आहे.

 

See also  पाषाण-सुतारवाडी परिसरातील रस्त्यांच्या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात : राहुल कोकाटे