गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन..

0
slider_4552

दादर :

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. त्यांनी दादरच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.

सुलोचना लाटकर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सुलोचना लाटकर यांची कारकीर्द
सुलोचना लाटकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेपासून ते इतर भूमिकांपर्यंत काम केलं आहे, तर त्यांनी 250 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून सुलोचना यांनी चाळीशीच्या दशकात मराठी चित्रपटांतून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आणि अनेक हिट मराठी चित्रपट दिल्यानंतर त्या हिंदी चित्रपटांच्या नायिकाही बनल्या.

सुलोचना लाटकर यांना मिळालेले पुरस्कार
सुलोचना यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

See also  आपल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक च्या मुख्यमंत्र्यांना जशास तसे उत्तर द्यावे : अजित पवार