सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती..

0
slider_4552

पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल कार्यालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल एक वर्षानंतर गोसावी यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या २७ उमेदवारांमधून कुलगुरू शोध समितीने पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.सुरेश गोसावी, पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट केली होती.

शुक्रवारी (दि.२६ ) या पाचही उमेदवारांच्या मुलाखती राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी घेतल्या. त्यातून कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली असून त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत.

See also  औंध इंदिरा वसाहत व कस्तुरबा गांधी वसाहत येथील समस्या सोडविण्याची गायकवाड यांची मागणी.