एनसीबीची सगळ्यात मोठी कारवाई, एलएसडी या अंमली पदार्थांची तस्करीचा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भंडाफोड..

0
slider_4552

मुंबई :

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत एलएसडी या अंमली पदार्थांची तस्करीचा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भंडाफोड केला आहे.

याबाबत एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. या कारवाईत एलएसडी ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज कार्टेलचे संपूर्ण देशात नेटवर्क असल्याची माहिती उजेडात आली आहे. आरोपी आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी क्रिप्टो करन्सीचा वापर करत होते. गेल्या दोन दशकातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

एलएसडी हे कृत्रिम रसायन आहे. दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 15000 ब्लॉट्स जप्त करत 6 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एनसीबीने या कारवाईत 2.5 किलो गांजा, 4.65 लाख रुपये आणि एका बँक अकाऊंटमध्ये डिपॉझिट केलेले 20 लाख रुपये जप्त केले आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर सिंह यांनी केली आहे. सिंह यांनी सांगितले, की एलसीडी हे सिंथेटिक हा अंमली पदार्थ अत्यंत धोकादायक आहे. संपूर्ण देशभरात या पदार्थाची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या ड्रग्जची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे.

मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. याविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर 29 मे रोजी एका वाहनामधून 850 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले होती. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई केली होती.

https://twitter.com/ANI/status/1665978471519248385?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1665978471519248385%7Ctwgr%5E0c93dcdf8fe3b155c0207a505f5fd9f177df1d46%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  आमदार चंद्रकांत पाटील यांचे मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र