अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ…

0
slider_4552

रायगड :

अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाला असून या वादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे यादरम्यान मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये.

तसेच पर्यटकांनीही समुद्रात उतरु नये असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून तसेच समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसारर हे आवाहन करण्यात आले आहे.

या कालावधीत पावसाची स्थिती अशी राहील

9 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी वादळी वारा ( वार्‍याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) व विजांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा ( वार्‍याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 11 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तर 12 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 9 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनार्‍याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. काही ठिकाणी किमान 40 ते कमाल 60 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. 10 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनार्‍याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रति तास वेगाने तर कमाल 55 किमी वारे वाहण्याची शक्यता आहे. दि.11 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा महाराष्ट्र किनार्‍याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रति तास वेगाने तर दि.12 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनार्‍याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. आणि समुद्राजवळून 40-50 किमी तर कमाल 55 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

तरी या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने नागरिकांनी समुद्रात जावू नये, पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये.कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नागरिकांनी खालील

See also  राज्यात काही ठिकाणी कडाक्याची थंडी, काही ठिकाणी पाऊस : हवामान खात्याचा अंदाज

क्रमांकावर संपर्क साधावा

जिल्हा नियंत्रण कक्ष-02141-222097

2. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष-02141-228473 टोल फ्री नं.112

3. प्रादेशिक बंदर विभाग नियंत्रण कक्ष-02141-222746

तर जिल्ह्यातील ठिकाणी तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत असून ते पुढीलप्रमाणे :

1.अलिबाग- 02141-222054, तहसिलदार विक्रम पाटील, मो.क्र.8879343401

2. पेण-02143-252036, तहसिलदार, श्रीमती स्वप्नाली डोईफोडे, मो.क्र.9921873159

3. मुरुड- 02144-274026, तहसिलदार, श्री.रोहन शिंदे, मो.क्र.8087243789

पनवेल-022-27452399, तहसिलदार, श्री.विजय तळेकर, मो.क्र.9420919992

उरण-022-27222352, तहसिलदार,

उध्दव कदम, मो.क्र.8108504037

कर्जत- 02148-222037, तहसिलदार,

शितळ रसाळ, मो.क्र.8087513083

खालापूर-02192-275048, तहसिलदार,श्री.आयुब तांबोली, मो.क्र.9975751076

माणगाव- 02140-262632, तहसिलदार, श्री.विकास गारुडकर, मो.क्र. 9049929914

तळा-02140-269317/7066069317, तहसिलदार, स्वाती पाटील, मो.क्र.9653448578

रोहा-02194-233222, तहसिलदार,डॉ.किशोर देशमुख, मो.क्र.9960248999

पाली-02142-242665, तहसिलदार,श्री.उत्तम कुंभार, मो.क्र.9422840625/9975655375

महाड-02145-222142, तहसिलदार,श्री.सुरेश काशिद, मो.क्र.9921332695/8180932485

पोलादपूर-02191-240026, तहसिलदार,श्री.समीर देसाई, मो.क्र.9673163479

म्हसळा-02149-232224, तहसिलदार,श्री.समीर घारे, मो.क्र.9503707370

श्रीवर्धन-02147-222226, तहसिलदार,श्री.महेंद्र वाकलकर, मो.क्र.7038754822

अधीक्षक माथेरान-02148-230294, श्री.दिक्षात देशपांडे, मो.क्र.8669056492

जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा , कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, कोणत्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्राकडून करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांना केले आहे .