मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही, काही काळ वाट पाहावी लागणार.

0
slider_4552

पुणे :

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधून राजस्थानात गेले. सध्या हे चक्रीवादळ राजस्थान, पाकिस्तानच्या काही भागात आहे. अन् ते कमकुवत झाले आहे. तसेच पुढच्या ६ तासात अजून कमकुवत होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळाने मान्सूनवर परिणाम केला आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. तो थांबला आहे. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील मान्सूनची प्रगती सध्या थांबली आहे. मान्सून रत्नागिरीतच थांबला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. परंतु चांगली बातमी म्हणजे दक्षिण द्विपकल्पातील काही भागांमध्ये आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये १९-२२ जूनपर्यंत मान्सूनची प्रगती होणार आहे. मान्सून सध्या रत्नागिरीतच रुसून बसला आहे. यामुळे राज्यभरातील त्याचा पुढचा प्रवास थांबला आहे. शनिवारीसुद्धा मान्सूनची काही प्रगती झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1669975148798128130?s=20

See also  वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल नेमलं का ? केंद्राने हे सॅंपल परत न्यावं अन्यथा महाराष्ट्र बंद चा उद्धव ठाकरे यांचा इशारा