इंदिरा वसाहत मधील महिलांचा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल.

0
slider_4552

औंध :

गणेश खिंड रोड औंध येथील इंदिरा वसाहत मध्ये गेले दोन-तीन वर्षापासून पाण्याची अडचण होत आहे . आठवड्यातील एक दिवस पाणी पुरेशा दाबाने सोडले जाते त्यानंतर दोन दिवस पाणी कमी दाबाने असते, गुरुवारी पाणी नसते अशा पद्धतीचे पाणी नियोजन केले जात असल्यामुळे पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर महिलांनी शाब्दिक हल्लाबोल केला.

सतत महापालिका अभियंताकडे तेथील महिला व आपचे स्थानिक पदाधिकारी विकास लोंढे यांनी तक्रार करीत होते. या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे पाणी पुरवठा असिस्टंट इंजिनिअर केदार साठे , शितल जोशी यांना येथील महिलांनी वस्तीमध्ये येणे भाग पाडले व वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

ऐन पावसाळ्यातही पाण्याची अडचण असल्याने संतापलेल्या महिलांच्यापुढे महापालिका अधिकाऱ्यांना काही बोलता आले नाही. त्यानंतर मुख्य पाणी लाईन वरील वॉलव्ह उघडण्यात आला. हा वॉलव्ह हवा तेव्हा बंद करून पाणी कमी केले जात असल्याचे लक्षात आल्याने याचा जाब अभियंतांना विचारला, परंतु ते त्याचे उत्तर देऊ शकले नाहीत. यानंतर या आठवड्यामध्ये सर्व लाईन तपासून पाणी व्यवस्थित मिळेल अशी व्यवस्था करू असे आश्वासन दिल्यावर महिलांनी अभियंतांना जाऊ दिले.

See also  गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात महामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी..