पुणे :
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची दिनांक 12 में 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी चंद्रभान उफ भानू खळदे याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
भानू खळदे ह्याला पोलिसांनी तब्बल 57 दिवसांच्या तपास कार्यानंतर नाशिकमधून अटक केली होती. खळदेची पोलीस कोठडी संपल्याने त्याची रवानगी आता येरवडा कारागुहात करण्यात आली आहे.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची दिनांक 12 मे 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येत अटकेत असलेल्या आरोपींच्या जबाबातून प्रमुख आरोपी आणि मास्टरमाईंड म्हणून भानू खळदे ह्याचे नाव समोर आले होते. चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय 63, रा. कड़ोलकर कॉलनी, तळेगाव दाभाड़े) हा किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर मावळमधून पसार झाला होता. तेव्हापासून त्याच्या मागावर पोलिसांची पथके होती, पोलिसांनी त्याला 8 जुलै रोजी नाशकातून अटक केली.