संततधार पाऊसा मुळे मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन रद्द

0
slider_4552

मुंबई :

मुंबईत संततधार पाऊस सुरु आहे. रेल्वे मार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. बुधवार (दि. १९) आणि गुरूवार (दि. २०) असे दोन दिवस या ट्रेन वाहतूक बंद राहणार आहे.

रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे पाच ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी या पुणे – मुंबई धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. पुणे-मुंबई दररोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गासाठी या ट्रेन महत्वाच्या आहेत. दोन दिवस ट्रेन रद्द झाल्यामुळे याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे. ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

डेक्कन क्विन- 12123 सीएसएमटी-पुणे 19.7.23 आणि12124 पुणे-सीएसएमटी 20.7.23, सिंहगड एक्सप्रेस- सीएसएमटी -पुणे 19.07.23 आणि 11010 पुणे-सीएसएमटी 20.07.23, डेक्कन एक्स्प्रेम- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 11007 सीएसएमटी-पुणे 20.07.23, इंटरसिटी- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 12127 सीएसएमटी-पुणे 20.07.23, इंद्रायणी- पुणे-सीएसएमटी 19.07.223 आणि 22105 सीएसएमटी-पुणे 20.07.23 या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

See also  पावसाळ्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी काही दुकाने अत्यावश्यक सेवेत.