औंध :
औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये मोहल्ला कमिटी बैठक घेण्यात आली. यामध्ये नवीन नियुक्त झालेले सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांचे कमिटीच्या सदस्यांकडून स्वागत करण्यात आले.
दरम्यान मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडी परिसरात पडलेले रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मांडली. तसेच रस्त्यावर साठत असलेले पावसाचे पाणी यावर उपाययोजना करण्याची मागणी ही नागरिकांनी केली. सुस रोड परिसरातील सिग्नल सुरू करण्यात यावे, स्मार्ट सिटी ने केलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी कमिटीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आली.
सुसगाव परिसरातील गावठाणा जवळील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. सुसगाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच मोहलाला कमिटीच्या बैठकीमध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात यावे. औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडी परिसरातील लटकलेल्या केबल तसेच रस्त्यावरती अस्तावेस्त पडलेल्या केवळ ताबडतोब हाठवण्यात याव्यात. आठवडी बाजाराचा पडणारा कचरा ही उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी. बालेवाडी हाय स्ट्रीट, औंध आयटीआय परिसर व वसाहती मधील स्वच्छतागृहाचे प्रश्न महिलांनी बैठकीमध्ये उपस्थित केले.
या सर्व समस्या बाबत बोलताना नवीन आलेले सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी सांगितले की, सदर समस्यांची पाहणी करून ज्या क्षेत्री कार्यालया अंतर्गत येणाऱ्या समस्या आहेत त्या तत्काळ लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू.