पालघर :
जयपूर एक्स्प्रेसमध्ये पोलिसाकडूनच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. यामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका आरपीएफच्या जवानाचाही समावेश आहे. वापी आणि पालघर दरम्यान ही घटना घडली आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.







घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. सध्या ही मुंबई सेंट्रल येथे थांबवण्यात आली आहे. तर हा गोळीबार एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरपीएफ जवानानेच सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. चेतन सिंह नावाचा आरपीएफचा जवान जो एस्कॉर्ट ड्युटीवर होता, त्याने एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
गोळाबार करणाऱ्या चेतन सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन सिंग याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची माहितीही समोर आली आहे. तर मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
An RPF constable opened fire inside a moving Jaipur Express Train after it crossed Palghar Station. He shot one RPF ASI and three other passengers and jumped out of the train near Dahisar Station. The accused constable has been detained along with his weapon. More details…
— ANI (@ANI) July 31, 2023








