रानातला कवी हरपला; जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे निधन

0
slider_4552

पुणे :

जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे पुण्यात निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.

बोलीभाषेतून रानातल्या, गाव खेड्यातील जीवनाची कथा आपल्या कवितेतून सादर करणारे जेष्ठ कवी ना. धो. महानोर. त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर येथील पळसखेड येथे 16 सप्टेंबर 1942 साली झाला.

त्यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध येतो.

महानोर हे 1978 साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले. त्यांच्या साहित्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

See also  ओबीसी आरक्षणावरुन राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न