महाराष्ट्र कंसिनो कायदा रद्द …गौरी-गणपतीसाठी १०০ रुपयांत आनंदाचा शिधा; शिंदेसरकारचा निर्णय

0
slider_4552

मुंबई –

मुंबईत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्द केला आहे. शिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्तही अनेक निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

 

 मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय

 

आदिवासी विकास विभाग राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार,. त्यासाठी ५ हजार कोटीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे .

अन्न व नागरी पुरवठा गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा.

कौशल्य विकास आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दरमहा ५०० रुपर्ये मिळणार आहे.

मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी महसूल विभाग महाराष्ट्र कैसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे.

गृह विभाग केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच यात राज्याचा हिस्सा वाढला गेला आहे.

महिला व बाल विकास सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे.

सहकार विभाग दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्याना सुधारित निवृत्तीवेतन,

विधी व न्याय विभाग मंडणगड येथे दिवाणी न्यायालय.

See also  सरकारने दहा सनदी अधिकाऱ्यांची केली बदली, तुकाराम मुंडेंचा वनवास संपला..