मुंबई :
कायद्यानुसार महसूल विभागातर्फे मिळणाऱ्या सेवांचा कालावधी निश्चित आहे. महसूल अंतर्गत विविध सेवांचे शुल्क ठराविक आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांकरिता एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. प्रशासनातील कोणत्याही अडलेल्या कामासाठी, बिंदू नामावली, महसूलमधील विविध दाखले, रेशनकार्ड, आधार कार्ड, महा ई सेवा केंद्राच्या तक्रारी, निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही अडवणुकीसाठी सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवता येऊ शकते.







शासनाने 18001208040 टोल फ्री क्रमांक याकरिता उपलब्ध करुन दिला आहे. कायद्यानुसार ग्रामसेवकामार्फत मिळणारे विविध दाखले, त्यासाठी लागणारा कालावधी आणि शुल्क याबाबत काही नियम आहेत. निर्धारीत शुल्कात आणि वेळेच्या आत जनतेला प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. परंतू जर आपल्याला निर्धारीत वेळेत आणे शुल्कात सेवा मिळत नसल्यास 18001208040 या क्रमांकावर तक्रार करता येईल.
कायद्यानुसार महसूल विभागातर्फे मिळणाऱ्या सेवांचा कालावधी निश्चित आहे. महसूल अंतर्गत विविध सेवांचे शुल्क ठराविक आहे. त्यापेक्षा जास्त पैसे देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. महा ई सेवा केद्र आणि नागरी सुविधा केंद्रातून हे दाखले घेताना जास्तीचे पैसे देऊ नका, असेही आवाहन सामान्यांना आहे. तसेच शुल्काची पावती घ्यायलाही विसरु नका. अतिरिक्त पैसे मोजून नागरिकाच्या खिशाला कात्री आता लागणार नाही. दलाली करणायांना शंभर टक्के आळा बसेल नागरिकांना सावधान अतिरिक्त कोणी पैसे मागत असेल तर आपण ह्या हेल्पलाइनवर तक्रार करू शकता. विनाकारण होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.








