पुणे :
पुणे पीएमपीएलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पीएमपीएलच्या बसेसमध्ये युपीआय पेमेंट म्हणजेच फोन- पे गुगल- पे वरुन तिकीट काढता येईल. पुढील आठवड्यापासून सर्व बसेसमध्ये स्कॅनरची सुविधा बसवण्यात येणार आहे.







याबाबत सविस्तर माहिती अशी की, बस प्रवास करताना सुट्ट्या पैशांसाठी वाद होणे काही नवीन नाही. आता या सुट्ट्या पैशांच्या टेन्शनमधून पुणेकरांची कायमची सुटका होणार आहे. पुण्यातील पीएमपीएल बसमध्ये पुढील आठवड्यापासून गुगल पे, फोन पे, पेटीएम म्हणजेच युपीआय तिकीट काढण्याची सुविधा सुरु होणार आहे.
सुट्ट्या पैशावरुन वाहक आणि प्रवाश्यांमध्ये वाद होत असल्याचे प्रकार समोर येत होते. तसेच अनेक वाहक सुट्टे पैसे परत करत नसल्याच्या तक्रारीही प्रवाश्यांकडून येत होत्या. त्यामुळेच आता सर्व बसेसमध्ये युपीआय पेमेंट (UPI Payment) सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
पुढील आठवड्यापासून पीएमपीएलच्या सर्व बसेसमध्ये स्कॅनर उपलब्ध होणार आहेत. हे तिकीटाचे पैसे थेट पीएमपीच्या खात्यात जमा होणार होतील. या युपीआय पेमेंट प्रणालीमुळे भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे.







