अनाथ बालकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0
slider_4552

पुणे :

महिला व बाल विकास विभागाकडून अनाथ बालकांना अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येते. 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आई वडीलांचे निधन झालेल्या जिल्ह्यातील अनाथ बालकांच्या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागाने केले आहे.

अनाथ प्रमाणपत्राद्वारे अनाथ बालकांना शासकीय पदभरती व शैक्षणिक कामासाठी 1 टक्का आरक्षणाचा लाभ घेता येतो. अनाथ प्रमाणपत्रासाठी आई, वडील यांचा मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे 3 छायाचित्र अर्जासोबत 3 प्रतीत जोडून सादर करणे आवश्यक आहे.

संबंधितांनी त्यांचा प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गुलमर्ग सोसायटी, 3 रा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ पुणे येथे सादर करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7373007338, 9673125066 आणि 9011080484 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

See also  पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर