शरद पवार यांच्या शब्दाने रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेला बळ
पुणे :
आज रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून प्रारंभ झाला. नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच तरुणांचे प्रश्न सोडवणे हा या यात्रेचा उद्देश समोर ठेऊन रोहित पवार यांनी यात्रेला सुरुवात केली. या यात्रेला हजर राहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देऊन प्रेरणा दिली. आपले अनुभव मांडत त्यांनी रोहित पवार यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले.
पुण्यातील टिळक स्मारकामध्ये या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी शरद पवार यांनी सुरुवातीलाच कंत्राटी भरतीचा मुद्दा उपस्थित केला होता. शरद पवार म्हणाले, की समाजकार्य करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या तरुणांच्या आशा आणि आकांक्षा प्रफुल्लीत करण्यासाठी ही मोहीम रोहित पवारांनी हाती घेतली आहे.
ही मोहीम मोठी असून यामधून अनेक तरुणांचे प्रश्न सुटणार आहेत. यापुढे तरुणांचे प्रश्न सरकार दुर्लक्ष करणार नाहीत. आणि असे झाल्यास सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. आणि यासाठीच ही मोहीम महत्त्वाची आहे. असे शरद पवार म्हणाले.
या दिंडीचे महत्त्व सांगताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या जळगावपासून ते लातूर पर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीचे महत्त्व सांगितले. विधीमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते मात्र त्यावेळी फारसं यश आलं नाही. त्यानंतर विधानसभेचं अधिवेशनावेळी शेतकऱ्यांची दिंडी काढल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी शैक्षणिक फिचा मुद्दाही उपस्थित करत सरकारच्या शैक्षणिक धोरणावर टीका केली. काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत तर काही शाळा भरमसाठ फि घेतात असे वक्तव्य केले.