मुंबई :
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे आज निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.







बाबा माहाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. त्यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे.
बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन केले. तसेच आपले आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले होते.








