वेळ घेऊन सरसकट आरक्षण देणार का? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

0
slider_4552

मॅक न्यूज नेटवर्क :

सह्याद्री अतिथी गृहावर पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या ठरावावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी सरकारला सवाल केला आहे. ते म्हणाले, सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे? मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार आहात का? ते आधी सांगा. सर्वपक्षीय बैठकीत काय घडले त्या तपशिलाच मला काहीही करायचं नाही. असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले.

गोरगरीबाच्या लेकरावर गुन्हे दाखल करण्याच काम सरकारकडून सुरु आहे. ते हसण्यावारी नेतायत. आरक्षण द्या अरे तुरे बोलण बंद करतो. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे” असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

“तुम्ही मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुमच्या मनात काय आहे? हे कळू द्या. मराठा समाज दगाफटका करणारा नाही. आमच्याकडून खोट नाट वदवून घेऊ नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे मराठा समाज त्यांना अडवणार नाही. तसेच आज सायंकाळपासून जलत्याग उपोषण सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

See also  पुणे मेट्रोसह विविध विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण