मुंबई :
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या जग विख्यात क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.







या सोहळ्यास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नेते शरद पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे खजिनदार आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
वानखेडे स्टेडियमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा हा 22 फुटी पुतळा उभारण्यात आला असून आंतरराष्ट्रीय मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी तो तयार केला आहे.








