बाणेर येथे माजी नगरसेविका ज्योती कळमकर व भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या वतीने घेण्यात आला सरंजाम वाटप….
बाणेर :
भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्यावर चांगले संस्कार आहेत. मतदान ही मतदाराचे आमच्यासाठी दिलेले दान नसून, ते मतदाराने दिलेले कर्ज आहे. निवडून आलेला प्रत्येक भाजपाचा प्रतिनिधी हे कर्ज नागरिकांची विविध कामे करून व्याजासह फेडण्याचे काम करत आहे. त्यानुसार आपल्याला आपल्या भागात झालेली विकास कामे ही पहावयास मिळत आहेत. दिवाळी सारख्या मोठ्या सणाला सरंजाम वाटप होत आहेत, हे तुम्ही दिलेल्या मतांच्या कर्जाची परतफेड आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.







बाणेर येथे माजी नगरसेविका ज्योती कळमकर व भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सरंजाम वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, जगदीशजी मुळीक, सचिन पाषानकर, डॉ. संदीप बुटाला, पूनित जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, प्रल्हाद सायकर,लहू बालवडकर, विवेक मेहता, उत्तम जाधव, उमा गाडगीळ, सुभाष भोळ , मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे गावातील ५००० कुटुंबाना गोरगरीब नागरिकांना सरंजाम वितरण करण्यात आले. परिस्थिती कशीही असो सर्वांना आपल्या हिंदू धर्मातील सण चांगल्या पद्धतीने साजरा करता यावेत, या सणांमध्ये नागरिकांना आनंद मिळावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे गणेश कळमकर यांनी याप्रसंगी सांगितले.








