पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता, रविवारी गारपीटीचा अंदाज

0
slider_4552

पुणे :

बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच रविवारी (दि.26) उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तर कमाल तापमानही 31 अंशापर्यंच पोचले होते. पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यातच आकाश मुख्यतः ढगाळ आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण अंदमानच्या समुद्रात 26 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, 27 तारखेला त्याची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. हे क्षेत्र वायव्येकडे सरकून त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

See also  संकट काळात जनतेची खंबीर साथ आणि पाठिंबा च्या जोरावर चांगले काम राज्य सरकारची दोन वर्ष पुर्ण : उद्धव ठाकरे