वडगाव मावळ :
पुणे जिल्हा परिषद पुणे व पशुसंवर्धन विभागा मार्फत जिल्हा परिषद पुणे यांच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ५०% अनुदानावर वडगावातील शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार तसेच राज्यमंत्री-दत्तामामा भरणे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले हा बैलजोडी लोकार्पण सोहळा विधानभवन, पुणे येथे संपन्न झाला.
यावेळी कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.दिलीप वळसेपाटील, राज्यमंत्री-दत्ता भरणे, जि.प.अध्यक्षा-निर्मला पानसरे, उपाध्यक्ष-रणजित शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती-बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती-पूजा पारगे, समाजकल्याण-सभापती सारिका पानसरे, मु.कार्य.अधि-आयुष प्रसाद, मावळ आमदार-सुनील शेळके, शिरूरआमदार-अशोक पवार, जुन्नर आमदार-अतुल बेनके, वडगाव शेरी आमदार-सुनील टिंगरे,
जिल्हाधिकारी-डॉ राजेश देशमुख, विभागीय आयुक्त-सौरभ राव, जि.प.स -गणेश कदम, गटनेते-शरद लेंडे, जि.प.सदस्य-पांडुरंग पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ शिवाजीराव विधाते, जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख, सभापती मोनिका हरगुडे, सभापती विशाल तांबे व पुणे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे डॉ उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील मानाजी बबन खांदवे या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ५०% अनुदानावर वैयक्तिक लाभ योजनेच्या अंतर्गत बैलजोडीचे वितरण करण्यात आले,
ज्या शेतकऱ्यांना ५ एकर च्या आत जमीन आहे तसेच ज्यांच्या कडे ट्रॅक्टर नाही असे शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र धरण्यात आलेले आहेत, तसेच अर्थिक दृष्टीने कमकुवत व अल्पभूधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांनी दिली.