रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे चमकदार यश

0
slider_4552

पुणे :

बी.एम.सी. सॉफ्टवेअर इंडिया आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेच्या बी. टी. सहानी नवीन हिंद हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी युरोपातील एस्टोनिया येथे झालेल्या रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन पोडियम पोझिशन्स जिंकत उल्लेखनीय यश मिळविले.

या स्पर्धेत ४० देशांतून पाच हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये या पुण्याच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील (स्टेम)उत्तम शिक्षण आणि नावीन्यपूर्ण तायात उत्तम कामगिरीकरणाऱ्या रोबोटेक्सइंडिया, याना-नफा संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये वाढवून परिवर्तन करण्याची आपली कटिबद्धता विविध उपक्रमांतून कायमराखली आहे. टॅलिन, एस्टोनिया येथे नुकतीच संपन्न झालेल्या रोबोटेक्स आंतरराष्ट्रीय अंजिक्यपद (रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२३) स्पर्धेत महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे या कटिबद्धतेचेच प्रतीक आहे.

या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची झलक दाखविणाऱ्या दोन प्रकल्पांना विजतेपद मिळाले. आरती चव्हाण आणि अंबिका ठाकूर या आठवीतील विद्यार्थिनींनी जलप्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी बनवलेली स्मार्ट रिव्हरक्लिनिंगबोट अर्थात नदीतील कचरा गोळा करणारी स्मार्ट बोट यशाची मानकरी ठरली, तर नवव्या इयत्तेतील दिपाली साळवे आणि बिपिन तिवारी यांच्या अॅग्रिकोसड्रोन या प्रकल्पाने शेतकऱ्यांसाठी एक क्रांतीकारी उपाय योजना सादर केली आहे. या ड्रोनच्या साह्याने पावसाच्या ढगातील खनिजे शोधून शेतकऱ्यांना परिपूर्ण खतांची निवड करण्यात मदत करणे शक्य झाले आहे.

बी. टी. सहानी स्कूल मधील शंभरहून अधिक संघांनी रोबोटेक्स इंडियाने यंदा आयोजित केलेल्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धांमध्ये भाग घेतला. विशेष म्हणजे, त्यातील चार संघांनी राष्ट्रीय स्तरावर पोडियम पोझिशन्स मिळवून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोटेक्स अजिंक्य पद स्पर्धेत ही यश मिळविले. या जागतिक स्पर्धेचे हे यंदाचे २४ वे वर्ष असून, ती जगभरातील सर्वांत मोठ्या रोबोटिक्स महोत्सवां पैकी एक आहे.

पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आज बी. टी. सहानी नवीन हिंद विद्यालयाच्या या विजेत्या संघांना गौरविण्यात आले. यावेळी आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, “बी. एम. सी. सॉफ्टवेअरने, सामाजिक जबाबदारी उपक्रमाद्वारे, आठ विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचालीत मदत करण्यात महत्त्व पूर्ण भूमिका बजावली आहे. या कंपनीने दिलेल्या निधीमुळे या विद्यार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसा आणि विमान तिकीट या सारख्या अत्यावश्यक बाबी सुलभ झाल्या आणि या जागतिक स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग ही सुनिश्चित झाला.

See also  पुण्यात नविन रुग्ण संख्या घटली : खबरदारी घेतल्याचा फायदा

“आम्ही अशा युगाचे साक्षीदार आहोत जिथे भारत, एक देश म्हणून, तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची नवी व्याख्या निश्चित करत आहे.या वाटचालीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला नव्या दिशा शोधण्यासाठी मदत करण्याची आमची भूमिका आहे.या अनुषंगाने रोबोटेक्स इंडिया सोबतच्या आमची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.देशभरातील विद्यार्थ्यांना वर्तमानात आणि भविष्यातही भरभराटीची संधीउपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे बी. एम. सी.सॉफ्टवेअरचे भारतातील प्रमुख साकार आनंद म्हणाले.

“बी एम सी आणि रोबोटेक्स इंडिया लिंग समानतेला चालना देण्यासाठी आणि वंचित समुदायांनाही डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा भारताच्या भावी कार्यशक्तीला आकार देण्याच्या प्रयत्नांचा हा आधारस्तंभ आहे.

स्टेम प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आम्ही मुलां मधील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत.यामुळे ही मुले केवळ सक्षम बनत नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांसाठी परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ही निर्माण होते,” असे बी. एम. सी. सॉफ्टवेअर मधील कॉर्पोरेट सिटीझनशिप आणि डी ई आयचे ग्लोबल हेड वेंडीरेंटश्लेर म्हणाले.