नाताळ आणि थर्टी फर्स्ट ची पार्टी करताना सावधान, पोलिसांची असणार करडी नजर

0
slider_4552

पुणे :

नाताळ आणि थर्टी फर्स्ट ची पार्टी करताना सावधान, पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुण्यात नाताळ,‘थर्टी फर्स्ट’ पार्ट्यांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

रुफटॉप हॉटेल, बंगले, बार, फार्म हाउसवर आता उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे. अवैध दारू खरेदी-विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील सासवड, हडपसर, दौंड, तळेगाव दाभाडे, नारायणगाव तसेच पुणे- नाशिक, पुणे -सातारा, पुणे –मुंबई, पुणे -सोलापूर महामार्गाच्या हद्दीवरील महामार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

See also  सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या शुक्रवारी.