लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेबरोबर चैतन्य स्पर्श सोहळ्याचेही आयोजन…

0
slider_4552

बालेवाडी  :

लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा आयोजना बरोबरच चैतन्य स्पर्श भारतातील बारा शक्तिपीठांच्या पादुकांच्या दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राबवण्यात येणार आहे.

भजन भाविकांसाठी ‘महिला व पुरुष भव्य भजन स्पर्धा-२०२४’ चे उद्घाटन हभप पांडुरंग अप्पा दातार, हभप संजय बाप्पु बालवडकर आणि हभप उद्धव गोळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी, या ठिकाणी झाले. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील परिसरातील जवळपास शंभरच्या वर पुरूष व महिला भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, विद्या लहू बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, हभप मारुती कोकाटे, बबनराव चाकणकर, गजानन बालवडकर, विश्वास कळमकर, प्रकाश बालवडकर, बाळासाहेब बालवडकर, कांतीलाल बालवडकर, विठ्ठल मांगडे, किसन टकले, राजाभाऊ मुरकुटे, ह भ प उद्धव गोळे, राकेश पाडाळे, राहुल कोकाटे, उत्तम भाऊ जाधव, माजी नगरसेविका,रंजाता ताई माने टिळेकर, सचिन पाषाणकर, विवेक मेहता, ह भ प मोरे महाराज, सुरेश तात्या सायकर, सुभाष भोळ, अस्मिता करदिंकर,वैशाली कमाजदार,ह भ प नितीन निम्हण राजुभाऊ मुरकुटे,ज्ञानेश्वर आप्पा बालवडकर मधुकर बालवडकर,अर्जन टकले,किसन बालवडकर आदी उपस्थित होते.

भजन स्पर्धा व चैतन्य स्पर्श उपक्रमाबरोबरच आयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त २१००० दिव्यांची आरास, महिला व पुरुषांचे सामूहिक रामरक्षा पठण, ५१ तबला व पखवाद वादकांची जुगलबंदी असे धार्मिक कार्यक्रमाची ठेवण्यात आल्याचे लहू बालवडकर यांनी सांगितले.

 चैतन्य स्पर्श सोहळा बारा शक्तिपीठांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ नागरिकांना सहा जानेवारी रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाणेर बालेवाडी रोड कंफर्ट झोन सोसायटी समोरील क्रीडांगणात घेता येणार आहे. लहू बालवडकर सोशल वेल्फेअर च्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी या दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

 

See also  बेकायदा रुफ टॉप हॉटेल वर होणार कारवाई, पालिका ॲक्शन मोडमध्ये पोलिसांत होणार गुन्हा दाखल.