बाणेर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ते 22 जानेवारी दरम्यान देशातील सर्व धार्मिक स्थळाची स्वच्छता करण्याचे आव्हान देशवासीयांना केले आहे त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत बाणेर परिसरामध्ये सर्वपक्षीय नेते व स्थानिक नागरिकांकडून मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना व नागरिकांना परिसरामधील मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आवाहन केले होते त्यास प्रतिसाद देत बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली.







आयोध्या येथे श्री राम लल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवार दिनांक 22 रोजी होणार आहे यानिमित्त संपूर्ण देशामध्ये नागरिक आनंदोत्सव साजरा करत आहेत. यानिमित्त बाणेर मध्ये देखील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाणेर परिसरात मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले हे अभियान गुरुवार, शुक्रवार ,शनिवार असे सलग तीन दिवस राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच परिसर सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला. यानंतर बाणेर येथील हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, बाणेश्वर मंदिर ,तुकाई माता मंदिर, विठ्ठल मंदिर बाणेर येथे देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस बाणेर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहभाग घेतला.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर, भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, कोथरूड उत्तर मतदार संघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहू बालवडकर, विशाल विधाते, किरण चांदेरे , प्रवीण शिंदे, सुभाष भोळ, यश ताम्हणे, संदीप वाडकर, संजय नाना मुरकुटे, सुधाकर धनकुडे, सागर ताम्हणे तसेच परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








