मुंबई :
मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली असताना त्यांच्यावर मुंबई हायकोर्टाने त्यांना नोटिस बजावली आहे. केवळ त्यांनाच नव्हे तर हायकोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही नोटीस दिली असून ही नोटिस गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर देण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्याकडे कोर्टाने नोटिसामार्फत आंदोनाची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना दोन आठवड्यांचा अवधीही दिला आहे.







मनोज जरांगे पाटील यांनी जोवर आरक्षण मिळणार नाही तोवर मुंबई सोडणार नसल्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले असून आज त्यांचा मोर्चा पिंपरी चिंचवडमध्ये धडकला आहे. 26 जानेवारी रोजी ते मुंबईत दाखल होणार आहेत. या दरम्यानच आता हायकोर्टाने आधी त्यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
या सोबतच कोर्टाने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाला एवढ्या मोठा जनसंख्येची कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार याचे उत्तर मागितले आहे. यादरम्यान गरज वाटल्यास सदावर्ते यांना पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.








