पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला मिळणार गती…

0
slider_4552

पुणे :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 23) मुंबईत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पुणे- नाशिक या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांची पुणे व नाशिक शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे. तसेच यामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी 2500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. पुणे आणि नाशिक दरम्यान 235 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरूनच सेमी हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. हा मार्ग महारेल कडून तयार केला जाणार आहे. नाशिक मधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत या रेल्वेमार्गाबाबत चर्चा केली. त्यामुळे या कामातील सर्व अडथळे दूर करत लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अश्वमेघ यज्ञ निमित्त मुंबई येथे आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचीही सदिच्छा भेट घेतली.

See also  गणेशोत्सवाला येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबले पाहिजे – राज ठाकरे