सातारा :
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा देखील वापरण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.







देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किंचक नवले याचा देवेंद्र फडणवीसांना धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत होता. तो वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता.
आता सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिसांनी त्याला साताऱ्यातील बाजार या ठिकाणाहून अटक केली आहे. याआधी योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.








