बाणेर :
महाशिवरात्री निमित्त श्री. क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, पांडवकालीन गुफा मंदिर बाणेर येथे १००८ वेळा शंखनिनाद करण्यात येणार आहे. हे ऐतिहासिक मंदिर महाशिवरात्रीनिमित्त सज्ज करण्यात आले असून यावेळी आकर्षक असे शंखनिनाद सर्वांना ऐकावयास मिळणार आहे.







बानेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून शास्त्रात शंखचे महत्व, शंखनाद ऊर्जा, संप्तश्री नाद, शंख सिद्धी पुजा, शंखनाद प्रशिक्षण आदी माहिती सहभागी होणाऱ्यांना देण्यात येत आहे. हा शंखनाद दिनांक ७ व ८ मार्च रोजी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री चार प्रहरांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये १०८ जन १००८ वेळा शंखनिनाद करणार आहेत अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

त्याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त बाणेर महिला भजनी मंडळाचे भजन, शिव अभिषेक, महारुद्र अभिषेक, भरतनाट्यम, महाआरती, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
शंखनिनाद
महाशिवरात्री निमित्त १००८ शंखनिनाद संकल्प कार्यक्रम दि.७ सकाळी – ७ ते ९.३० तसेच सांयकाळी ५ ते ८ वा ८ मार्च रोजी सकाळी ७ ते ९.३० महारुद्रपूजा समग्री तसेच चार प्रहर वेळामध्ये शंखनिनाद व महाआरती होईल सांयकाळी/रात्री ६.२५ ते ९२८, ९.२८ ते १२.३१, १२.३१ ते ३.३४,३.३४ ते६.३७








