भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर…

0
slider_4552

दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता होती. अखेर भाजपने आज संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर केलीआहे. या यादीमध्ये मोदी-शाह यांनी काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे.

*काही ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी दिली आहे.*

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी तर चंद्रपुरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणातून उतरवण्यात आले आहे. मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर मुंबईत पियूष गोयलआणि ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

*महाराष्ट्र भाजप उमेदवार यादी*

1) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

2) रावेर – रक्षा खडसे

3) जालना- रावसाहेब दानवे

4) बीड -पंकजा मुंडे

5) पुणे – मुरलीधर मोहोळ

6) सांगली – संजयकाका पाटील

7) माढा- रणजीत निंबाळकर

8) धुळे – सुभाष भामरे

9) उत्तर मुंबई- पियुष गोयल

10) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा

11) नांदेड- प्रतापराव चिखलीकर

12) अहमदनग र- सुजय विखे पाटील

13) लातूर- सुधाकर श्रृंगारे

14) जळगाव- स्मिता वाघ

15) दिंडोरी- भारत पवार

16) भिवंडी- कपिल पाटील

17) वर्धा – रामदास तडस

18) नागपूर- नितीन गडकरी

19) अकोला- अनुप धोत्रे

20) नंदुरबार- डॉ. हिना गावित

See also  अन्यथा संपूर्ण भरती प्रक्रियेलाच स्थगिती देऊ : मुंबई उच्च न्यायालय