ऑल  न्यू सफारी  ही कार लाँच करणार : टाटा मोटर्स

0
slider_4552

मुंबई :

टाटा मोटर्स  कंपनी आज (26 जानेवारी) त्यांची  ऑल  न्यू सफारी  ही कार लाँच करणार आहे. कंपनीने ही कार लाँच करण्यासाठीची तयारी पूर्ण केली असून आता सर्वांना केवळ लाँचिंगची प्रतीक्षा आहे. कंपनीने नुकताच या कारच्या प्रोडक्शन मॉडेलवरुन पडदा हटवला होता. आता सर्वांना केवळ लाँचिंगची प्रतीक्षा आहे.
ऑल न्यू टाटा सफारी या नावाने सादर केली जाणार आहे. सर्वात आधी ही कार 2020 Auto Expo मध्ये सादर करण्यात आली होती. Tata ची ही फ्लॅगशिप SUV असेल आणि ही 7-सीटर कार असेल.

नवीन टाटा सफारी एसयूव्ही OMEGARC (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture) प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय.

टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.

नवीन टाटा सफारीमध्ये खास बदल

# या एसयूव्हीमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जसे की, प्रोडक्शन व्हर्जनमध्ये मोठे हनीकॉम्ब पॉटर आणि क्रोम हायलाईटसह एलईडी प्रोजेक्टर लाईट दिली जात आहे.
# नवीन सफारीच्या इंजिन आणि डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक दमदार फिचर्ससह बनवली जात आहे.
# या कारमध्ये सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टियरिंग व्हील, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रिकग्नायजेशन, 7-इंचांचा इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रीमियम ओक मिळू शकतो.
# या कारमध्ये तपकिरी रंगांची लेदर सीट आणि जेबीएलचे स्पीकर्स दिले जातील.
# 2021 टाटा सफारी एसयूव्ही बीएस 6-कंप्लिट फिएट-सोर्सड 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे ऑपरेट होईल, जे 5-सीटर हॅरियर एसयूव्हीला पॉवर देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेलं असेल.
# या गाडीमध्ये तुम्हाला एक्सटिरियर पेंट ऑप्शन आणि नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात.
# नव्या अवतारातील एसयूव्हीमध्ये ग्राहकांना प्रवासाचा जबरदस्त अनुभव मिळेल. या कारचं डिझाईन, परफॉर्मन्स, मल्टी टास्किंग आणि अनेक प्रकारच्या सर्विसेसमुळे ही कार अधिक दमदार बनली आहे.

See also  भारतात इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्यासाठी Mahindra & Mahindra कंपनी सज्ज